पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कारची घटना चंद्रपूरमध्ये घडली. या प्रकरणातील आरोपी हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज साधू वासवानी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शने करणाऱ्यांना बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर सोडून दिले.
चंद्रपूरच्या युवक काँग्रेसचा अध्यक्षाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेची चर्चा सुरू झाल्यावर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याता पळून जाण्यापूर्वीच अटक करून बेड्या ठोकल्या. हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली साधू वासवानी चौकात जोरदार निदर्शने केली.
काँग्रेसच्या तसेच आरोपीला पाठिशी घालणा-या सर्वांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बंडगार्डन पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. भाजयुमोचे अध्यक्ष करण मिसाळ यांच्यासह शहर सरचिटणीस आशिष सुर्वे, युवती अध्यक्ष मनिषा धारणे, सरचिटणीस ओंकार डवरी, तुषार रायकर, निखिल शिळीमकर, स्वन्पा तावडे, शिवम बालवडकर, अमीत तोडरमल, प्रवीण वनशीव, सिद्धार्थ बावकर, प्रतिक कुंजीर, कुणाल गरूड यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय
-बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आणखी मोकाट; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
-शरद पवारांनी टिंगरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…
-आधी बांधलं मोदींचं मंदिर, आता दिली भाजपला सोडचिठ्ठी; नेमकं काय प्रकरण?
-‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अन्….’; ‘या’ माजी मंत्र्याने केला मोठा दावा