पुणे : कर्वेनगर रोडवरील नळ स्टॉप चौकात पहाटेपर्यंत विना परवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना चांगलेच भोवले आहे. डेक्कन पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे सव्वा पाच वाजताच्या दरम्यान कारवाई केली. या कारवाईमध्ये ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही नळस्टॉप भागात वेळेत खाद्यपदार्थांची विक्री बंद न केल्यामुळे आता पोलिसांनी आता कारवाई केली आहे.
पोलीस हवालदार प्रमोद तानाजी दोडके (वय ५७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, व्यंकटेश गायकवाड (वय २३, रा. सिंहगड रोड), विनोद भंगारदिवे (वय ४२, रा. एनडीए रोड), प्रथमेश पवार (वय २४, रा. कर्वे रस्ता), सचिन घोडके (वय २७, रा. एरंडवणे), संदीपसिंह (वय १९, रा. नळस्टॉप), महेश बाबू (वय २७, रा. कर्वेनगर) यांच्यावर भारतीय दंड संहिता २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या सर्वांना वारंवार तोंडी आदेश देऊन देखील नियमानुसार, खाद्य पदार्थांचे स्टॉल वेळेत बंद केले नाहीत. या आस्थापना अटी व शर्तीपेक्षा अधिक वेळ विनापरवाना सुरू ठेवून ग्राहकांना खाद्यपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आता आरटीओला न जाताही मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; कसं? वाचा सविस्तर…
-नागरिकांच्या दारात बँड वाजवला, करबुडव्यांच्या मिळकती जप्त, पालिकेची १८ दिवसांत ४० कोटींची वसुली
-मोठी बातमी: लोहगाववरून निघालेली वऱ्हाडाची बस ताम्हिणी घाटात पलटली, ३ महिलांसह पाच ठार, २७ जखमी
-पोलीस बांधवांच्या घरांसाठी आमदार रासने आक्रमक; विधानसभेत प्रश्न मांडत पुनर्विकासाची मागणी
-ईव्हीएममध्ये घोळाचा आरोप, पवारांची माघार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण