पुणे : कसबा मतदारसंघात भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात भाजपचे घटक पक्षातील सर्वजण सामील झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाने सहभागी करून घेतले. महिनाभर महायुतीने एकदिलाने प्रचाराचे काम केल्याने महायुतीचे उमेदवार हेमंत रासने विक्रमी मताधिक्याने निवडून येणार’, अशी भावना प्रचार संपताना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
लहानपणापासून गणेश मंडळामध्ये सक्रिय असणारे आणि आज राजकीय जीवनात काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हेमंत रासने यांनी केलं आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी २४ तास उपलब्ध असल्याने हेमंत रासने कामाचा माणूस आहे अशी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. आधी नगरसेवक आणि मग पुढे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना रासने कोरोनाच्या काळात केलेली कामे लोकांच्या आजही लक्षात आहेत हे प्रचारात नागरिकांनी त्यांना सांगितल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना विचारात घेत त्यांनी त्यांनी प्रचाराचे अचूक असे नियोजन केले होते.प्रचाराच्या दरम्यान रासने यांना सर्वच स्तरातून व्यापक जनसमर्थन देखील मिळाले. महाविकास आघाडीत झालेली धुसफूस एका बाजूला चर्चेचा विषय बनला असताना रासने यांच्या विजयासाठी महायुती एकदिलाने काम करत असल्याचे चित्र होते. हीच एकी आणि हीच एकजूट रासने यांना विजयी बनवणार असे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व मतभेद बाजूला सारून प्रमुख नेत्यांद्वारे ठिकठिकाणी कॉर्नर सभा, मतदारांच्या भेटीगाठी, बाईक रॅली आदींच्या माध्यमातून जोरदार प्रचार झाला. यातच अखिल भारतीय मराठा महासंघाकडून तसेच ओबीसी समाजाकडून देखील रासने यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या दोन्ही समाजासोबत भाजपला आणि हेमंत रासने यांना ब्राह्मण समाजाचा देखील जाहीर पाठिंबा मिळाल्याने हेमंत रासने यांची या मतदारसंघात ताकत वाढली असून सर्वसमावेशक नेतृत्वामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात पैसे, सोन्याने भरलेला ट्रक त्यानंतर आता सापडलेल्या ट्रकमध्ये काय सापडलं?
-टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांना जाण्यापासून अडवलं; अजित पवार म्हणाले, ”काकी माझ्या…’
-‘देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सगळ्यांना माहितीये’; सांगता सभेतून शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा