पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे. एआय (AI) संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील साखर संकुल येथे २१ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बैठकीचे आयोज करण्यात आले आहे. यावेळी काका-पुतणे एकत्र आल्याचे पहायला मिळणार आहेत. गेल्या १० दिवसामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची ही तिसऱ्यांदा भेट होणार आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार आणि अजित पवारांची ही तिसरी भेट आहे. साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले होते. त्यानंतर आता २१ एप्रिल रोजी देखील या नेत्यांची भेट होणार आहे. कार्यक्रम बैठकीसाठी एकत्र आलेले नेते राजकीयदृष्ट्या पुन्हा एक होणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.
शरद पवार हेच आपले दैवत असल्याचे दोन्ही गटांकडून सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा वारंवार रंगत असते. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही तसंच काहीसं वक्तव्य केलं आहे. ‘शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो’ असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-PMC: ठेकेदाराचे ‘लाड’ पुरवण्यासाठी अधिकारीच बनले ‘सैनिक’, बहुउद्देशीय पायघड्यांवर गुळगुळीत उत्तर
-“पवारांच्या जवळच्या संघटना ऐतिहासिक विषय उकरुन काढतात, त्यांनी फावल्या वेळात…” – गोपीचंद पडळकर
-धर्मादाय कायद्याचे तीनतेरा!; ‘या’ १२ रुग्णालयांनी एकाही रुग्णावर सवलतीत उपचार नाहीत
-युवा नेत्याचा मोठा डाव अजितदादा, विखे अन् शिंदेंना एकाच मंचावर आणणार, कोणाची विकेट उडणार?