पुणे : सध्या महाराष्ट्रात पंढरीची वारी सुरु आहे. या वारीसाठी खासदार शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी हे देखील या वारीमध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे नेते आचार्य तुषार भोसले यांनी सडकून टीका केली आहे.
शरद पवारांचे त्यांच्या ८४ वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधीला निमंत्रण देत आहेत? हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीना आषाढी वारीत येण्याचे निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला? अशा बोचऱ्या शब्दात टीका करत आचार्य तुषार भोसले यांनी महाविकास आघाडीसह राहुल गांधी आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
‘कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन तुम्ही वारीत यायला बघताय, हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा’ अशा शब्दात तुषार भोसले यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तू कधी मरशील….? भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान
-पुणेकरांनो सावधान! शहरात झिकाचे रुग्ण वाढले; गर्भवती महिलांना जास्त धोका
-Pune Hit & Run: आरोपीच्या वडिल, आजोबांना जामीन मंजूर; विशाल अग्रवालची पोलीस कोठडी कायम
-मोठी बातमी: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’त मोठे बदल; शिंदेंची विधानसभेत घोषणा