पुणे : झापूक झुपूक सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी सिझन ५’चा विजेता झाला आणि महाराष्ट्राच्या घराघरांत सूरजची झापूक झुपूक एन्ट्री झाली. कमी वेळात जास्तीत जास्त प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या सूरजच्या घराचं काम सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मतदारसंघातील सूरज आज घराघरामध्ये पोहचला आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या सूरजला घर बांधण्याची इच्छा होती. अजित पवारांनी त्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. अजित पवारांनी दिलेला शब्द पुर्ण होताना दिसत आहे. सध्या सूरजच्या घराचं काम सुरु असून बारामती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी बांधकाम सुरु असणाऱ्या घराला भेट दिली आहे.
बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना अजित पवारांनी संबंधितांना दिल्या आहेत. तसेच ‘लोकांना माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि तो शब्द पूर्ण करतोय’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
बिग बॉस मराठीचा विजेता, बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाणच्या नवीन घराच्या चालू बांधकामाची पाहणी केली. कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
📍बारामती pic.twitter.com/GlFDQoqBCj
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 13, 2025
मी दिलेला शब्द पाळत आहे. लोकांना माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे. त्या पद्धतीने सुरजला दिलेला शब्द पाळतोय. आज बारामती दौऱ्यावर असताना पाणीपुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी याच गावामध्ये आलो होतो. त्यामुळे जाता जाता सुरज च्या घराचं काम कुठपर्यंत आले ते पाहता आलं. परवा दिवशी सुरज भेटला होता तेव्हा त्याने घराचं काम सुरू असल्याचे सांगितलं होतं. पुढील महिनाभरात कंट्रक्शनचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दिवाळीच्या आधी सर्व काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय…’; अजित पवार नेमकं काय म्हणाले? पहा व्हिडीओ
-बांग्लादेशी तरुणीला पुण्यात नोकरीचे अमिष दाखवून आणले अन् बुधवार पेठेत…; नेमकं काय प्रकरण?
-पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा अहिल्यानगर पैलवान नेमका कोण?
-अष्टविनायकासह ‘या’ ५ मंदिरात पोशाखाची नियमावली जारी!; दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे?
-कोल्हापूरच्या सतेज पाटलांच्या पुण्यात महत्वाच्या बैठका; शहराध्यक्ष आणि संघटनात्मक मोठे बदल होणार!