पुणे : पुणे शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहरातील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रामुख्याने विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक शाखेत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये मुख्यत्वे वाहतूक, गुन्हे, विशेष शाखा येथील पोलीस निरीक्षकांच्या शहरातील पोलीस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
वाहतूक विभाग, पोलीस स्टेशन आणि विशेष शाखेत असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने चर्चा सुरू आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जाहीर केले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव २३ पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात बदल्या केल्या असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा, असेही आदेशात म्हटलं आहे.
बदली झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि ठिकाणे
1) सावळाराम पुरषोत्तम साळगावकर (व.पो.नि. भारती विद्यापीठ पोलीस ठाणे)
2) राहुल विरसिंग गौड (व.पो.नि. सहकारनगर पोलीस ठाणे)
3) संजय नागोराव मोगले (व.पो.नि. हडपसर पोलीस ठाणे)
4) सुनिल गजानन थोपटे(व.पो.नि. कोरेगाव पार्क पोलीस ठाणे)
5) दिलीप मगन फुलपगारे (व.पो.नि. खडकी पोलीस ठाणे)
6) सीमा सुधीरकुमार ढाकणे (व.पो.नि. चंदन नगर पोलीस ठाणे)
7) मनिषा हेमंत पाटील (व.पो.नि. मार्केट यार्ड पोलीस ठाणे)
8) राजेंद्र भाऊराव पन्हाळे (व.पो.नि. लोणी काळभोर पोलीस ठाणे)
9) सत्यजित बाळकृष्ण आदमाने (व.पो.नि. वानवडी पोलीस ठाणे)
10) नरेंद्र शामराव मोरे (वाहतूक शाखा)
11) सुरेश तुकाराम शिंदे (वाहतूक शाखा)
12) रुणाल सुजाउद्दीन मुल्ला (वाहतूक शाखा)
13) संगीता सुनिल जाधव (वाहतूक शाखा)
14) राजेंद्र हनमंतु करणकोट (वाहतूक शाखा)
15) स्वप्नाली चंद्रकांत शिंदे (वपोनि सायबर पोलीस ठाणे)
16) दशरथ शिवाजी पाटील (विशेष शाखा)
17) सतिश हणमंत जगदाळे (विशेष शाखा)
18) गुरदत्त गोरखनाथ मोरे (विशेष शाखा)
19) माया दौलतराव देवरे (गुन्हे शाखा)
20) संतोष लक्ष्मण पांढरे (गुन्हे शाखा)
21) संजय जीवन पतंगे (गुन्हे शाखा)
22) छगन शंकर कापसे (गुन्हे शाखा)
23) संतोष उत्तमराव पाटील (मनपा अतिक्रमण विभाग)
महत्वाच्या बातम्या-
-‘मराठवाड्याचा विकास बारामतीसारखा करणार’; पंकजा मुंडेंनी केलं अजितदादांचं कौतुक
-पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा; माजी उपसरपंचाची गाडी केली जप्त
-आधी डिलिव्हरी बॉय बनून केली रेकी अन् नंतर…; पुणे पोलिसांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई
-ऐकावं ते नवलंच! भूक लागली म्हणून चोरट्यांनी बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर नाहीच मिळाली पण…