पुणे : नागरी सुविधांसाठी लवकरच पुणे शहरातील ६१ रस्त्यांवर खोदकाम सुरु होणार आहे. महापालिकेच्या मलनि:सरण विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी शहरातील जवळपास ६१ रस्त्यांचे खोदकाम केले जाणार आहे. पुणेकरांना आधीच वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने पुणेकर त्रस्त असतात. अशातच आता पुणेकरांना हा आणखी मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
शहरातील रस्त्यांचे खोदकाम वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेला परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी काही कठोर अटींसह असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी महापालिकेला ‘हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करावे’, अशी तंबी दिल्याचे समोर आले आहे. शहरातील कोथरूड, वारजे, येरवडा, बाणेर, हडपसर, बालेवाडी, बीटी कवडे रोड, कोंढवा, बिबवेवाडी, धानोरी, शिवाजीनगर, सारसबाग या परिसरातील रस्त्यांवर खोदकाम केले जाणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या मलनिःसरण विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी रास्त खोदण्यास वाहतुक पोलिसांनी पुणे महापालिकेला परवानगी दिलीय. वाहतूक पोलिसांनी महापालिकेला कामाची परवानगी दिली असली तरी ही सर्व कामं ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचेही आदेश दिले आहेत. जर ३१ मे पर्यंत काम पूर्ण झालं नाही तर संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
-शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री म्हणतात, ‘अजितदादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात अन् आमची…’
-पहलगाम हल्ला: सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई; पोलिसांनी ‘त्या’ दोघांची घरे उडवली
-बारामतीचं शिष्टमंडळ अडकलं काश्मीरमध्ये; अजितदादांचा केंद्रीय मंत्री मोहोळांना फोन
-“माझ्या नवऱ्याचा चेहराही पाहता आला नाही”; शरद पवारांसमोर संतोष जगदाळेंच्या पत्नीचा टाहो