पुणे : राज्यात वारंवार महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच पुण्यातील राकेश खेडकर नावाच्या तरुणाने बंगळुरुमध्ये पत्नीची हत्या केली. राज्याला हादरुन गेलेलं स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण, ११ वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करत अपहरण केलं वारजे माळवाडी भागातील लॉजवर नेण्यात आलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अशातच आता पुणे शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यात एका तरुणाने आपल्या मित्राला आपल्याच बायकोसोबत शारिरीक संबंध ठेवावेत यासाठी घरी आणल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतः नपुंसक असल्यानेच पतीने पत्नीला मूलबाळ व्हावे आणि आपले पौरुषत्व दिसावे, यासाठी पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी मित्रालाच घरी आणला. हा सर्व धक्कादायक प्रकार पतीच्या मित्राने तक्रारदार महिलेला फोन करून सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.
संबंधित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून, पतीसह त्यांच्या मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसात दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, पीडित महिला ही पुण्यातील असून, पती हा सांगलीचा आहे. तोही सध्या पुण्यातच स्थायिक आहे. सांगलीत नवऱ्याच्या घरी राहत असताना पतीमध्ये आणि तिच्यामध्ये वारंवार वाद होत होते. त्यातून तो तिला मारहाण देखील करत होता. ६ महिन्यांपूर्वी महिला तिच्या माहेरी निघून आली होती.
२०२३ जुलैमध्ये दोघे एकत्र राहत असताना पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला आणि म्हणाला तो इथेच राहणार असून. त्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले. पण, त्या रात्री तो त्या विवाहीत महिलेकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. याबाबत पतीला सांगितलं तर त्याने तिला शिवीगाळ केली. या कारणावरुन त्या वेळी ती माहेरी निघून आली. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०१५ रोजी पतीच्या त्या मित्राचे महिलेला वारंवार मेसेज येऊ लागले. तिने दुर्लक्ष केले मात्र, १ मार्च रोजी पतीच्या मित्राने तिला त्या रात्रीचं धक्कादायक सत्य सांगितलं. ते समजल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
‘तुझ्या पतीने मला तुझ्याकडे शरीर संबंधासाठी येण्यासाठी सांगितलं होतं. त्याचबरोबर , तुझ्या पतीचा लैंगिक प्रॉब्लेम असल्याचेही त्याने तिला सांगितलं. त्याने मला तुझ्याकडे तो नपुंसक असल्यानेच व मूलबाळ व्हावे, या कारणामुळं शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणलं आहे’, असे त्याने सांगितले. या धक्कादायक माहिती त्यानंतर महिलेने पती आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का? अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?; उदयनराजे आक्रमक
-‘असा चमत्कार झाला तरच नमस्कार होणार’; विजय शिवतारेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान
-‘बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही’- अजित पवार
-विधानसेभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड, मात्र आता आमदारकी धोक्यात; नेमकं कारण काय?
-कर्जमाफी नाहीच! ‘३१ तारखेच्या आत शेतकऱ्यांनो पिककर्जाचे पैसे भरा’- अजित पवार