पुणे : पुणे शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची गर्दी पहायला मिळते. परिणामी अपघाताचे देखील प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच पुण्यातील चाकण-शिक्रापूर या महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याचे पहायला मिळाले आहे. चाकण-शिक्रापूर या महामार्गावर एका कंटेनर चालकाने चांगलाच हैदोस घातला होता. या कंटेनर चालकाने तब्बल २०-२५ गाड्यांना जबर धडक दिली आहे. या संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे पहायला मिळाली आहे.
पोलिसांनी तब्बल २० किलोमीटर कंटेनर चालकाचा पाठलाग केला. या माथेफिरु चालकाने जवळपास २०-२५ गाड्यांना जबर धडक दिली त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी चालकाला पकडून चांगलाच चोप दिल्या व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाकणहून शिक्रापूरच्या दिशेने निघालेल्या एका कंटेनरने रस्त्यात येणाऱ्या सर्व वाहनांना धडक दिली. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर या कंटेनरचा पाठलाग करुन चालकाला ताब्यात घेतलं.
दरम्यान, चाकणमधील माणिक चौकामध्ये या कंटेनरने ३ महिलांना उडवले होते. नंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने भरधाव वेगाने २० किलोमीटर पोलिसांना पाठलाग करायला लावला. त्यावेळी त्याने इतर वाहनांना धडक दिलीच मात्र, त्याला पकडण्यासाठी उभे असलेल्या पोलिसांच्या गाडीला देखील त्या कंटेनरने उडवले आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून १०-१५ जण जखमी आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कृषी मंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; अजित पवार म्हणाले, ‘अरे तो पहाटेचा…’
-‘राजकीय आश्रय, मर्जीतले प्रशासन अन्…’; बीडच्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांच्या आमदाराचा गंभीर आरोप
-पुणे शहर पोलीस दलातील २३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; पोलीस आयुक्तांचे आदेश
-‘मराठवाड्याचा विकास बारामतीसारखा करणार’; पंकजा मुंडेंनी केलं अजितदादांचं कौतुक
-पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा; माजी उपसरपंचाची गाडी केली जप्त