पुणे : प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करुन कष्ट करतात. मोठ्या कष्टाने आपल्या मुलांचा सांभाळ, शिक्षण तसेच इतर सर्व गरजा, त्यांचे लाड पुरवतात. हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य पार पाडत असतात. तसेच आईवडिलांच्या उतार वयात त्यांचा योग्य सांभाळ, त्यांचा दवाखाना करणं मुलांचं कर्तव्य. वडिलांची संपत्तीवर डोळा ठेवून त्यांच्या जीवाशी खेळून, अनेदा जीव घेऊनही संपत्ती घेत असल्याचं अनेक सिनेमांमध्ये दाखवलं जात. आता एखाद्या सिनेमाच्या कथेला लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एक बाप आपल्या लेकरांचा सांभाळ केला आणि शेवटच्या घटिका मोजत असताना त्यांच्याच पोटच्या मुलींनीच निर्दयीपणा दाखवला आहे. वडिल मृत्यूशी झुंज देत असताना, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांच्या ३ दिवट्या मुलींनी त्यांच्या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी चोरुन अंगठ्याचे ठसे बनावट मृत्यूपत्रावर घेतल्याचे उघडकीस आलं आहे. या घटनेने बाप नावाचे वादळ अक्षरश: शमल्याचे पहायला मिळाले.
वयाच्या ६५ व्या वर्षी कर्करोग आणि हृदयरोगाने त्रस्त रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आपल्या वडिलांच्या तब्बेतीची काळजी घेण्याऐवजी त्यांची मालमत्ता मिळवण्यासाठी तीन पाषाणहृदयी मुलांनी रुग्णालयात चोरुन त्यांच्या अंगठ्याचे ठसे बनावट मृत्यूपत्रावर घेतले. या व्यक्तीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. सर्वांचे विवाह झाले असून घरातील आर्थिक स्थिती देखील उत्तम आहे. वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 14 जानेवारीला पिंपरीतील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची स्थिती खूपच खराब झाली आणि ते ‘ब्रेन डेड’ झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरामध्ये राहणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला कर्करोग आणि हृदयरोग झाला. या वक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ आपल्याला वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा देणार नाही, असा समज झालेल्या ३ मुलींनी वडील आजारी असताना एकदाही भेटायला गेल्या नव्हत्या. मात्र त्यांना आपले वडील जगणारच नाहीत हे समजताच या तिघीही सलग तीन-चार दिवस भेटायला येऊ लागल्या. १९ फेब्रुवारी रोजी मुलगा रुग्णालयाच्या बाहेर गेला असताना मुली वडिलांजवळ गेल्या. त्यांनी मृत्युपत्र बनवून आणले होते. मुलींनी वडिलांच्या अंगठ्याचे ठसे त्यावर घेतले. दुसऱ्या कागदावर त्यांच्या हातात पेन देऊन सही घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने मुलींना थांबविले. पोलिसांना आणि मुलाला फोन केला. त्यानंतर मुलाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
“आम्ही चार भाऊ-बहिणी आहोत. बहिणींचे वरच्यावर घरी येणे-जाणे होते. मात्र, वडील आजारी पडल्यापासून त्या कधीही रुग्णालयात भेटायला आल्या नाहीत. वडिलांची प्रकृती खूप जास्त गंभीर असून, त्यांचा जीव वाचणे शक्य नाही, असे कळल्यावर त्या दोन-तीन दिवस रुग्णालयात आल्या. मात्र, रुग्णालयात येऊन त्यांनी केलेला प्रकार धक्कादायक आहे”, असे रुग्णाच्या मुलाने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भल्या सकाळी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदेंच्या खास मिशनवरुन राज संतापले
-गजा मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण; मोहोळांनी पुण्यात पोहचताच घेतली भेट
-रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?
-अमित शहा पुणे दौऱ्यावर; शहरात कडक बंदोबंस्त, बाणेर-बालेवाडी भागातील वाहतुकीतही बदल
-Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…