पुणे : पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचे चिरंजीव हेमंत बागुल यांनी एका दुचाकी स्वाराला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, बागुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रारदाराने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. आबा बागुल यांच्या राजकीय दबावामुळे पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचं तक्रारदार फय्याज सय्यद यांनी सांगितलं. तर बागुल यांनी तक्रारदार व्यक्ती प्रसिद्धीपोटी प्रतिमा मलीन करण्यासाठी हे सर्व करत असल्याचं म्हंटल आहे.
मंगळवार पेठेतील एका पेट्रोल पंपासमोर हा प्रकार घडला. सय्यद हे मालधक्का चौकातून मंगळवार पेठेच्या दिशेने जात होते. त्यावेळी पेट्रोल पंपासमोर एक लाल गाडी उभा होती. गाडीतील चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने सय्यद यांची गाडी बाजूला असणाऱ्या हेमंत बागुल यांच्या गाडीवर आदळली. गाडीला डेंट गेल्याने हेमंत बागुल यांनी जाब विचारला असता सय्यद यांनी अरेरावी करत दादागिरीची भाषा वापरल्याचे स्पष्टीकरण बागुल यांनी दिलं आहे. दरम्यान, या घटनेचा एक सीसीटिव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.
‘माझे वाहन सिग्नल लागल्याने थांबलेले असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करून त्या व्यक्तीने माझ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यातून त्याला जाब विचारला असता, त्याने अरेरावी केली. त्याने दादागिरी करुन शिवीगाळही केली. ज्यावेळी त्याला कळले की, मी आबा बागुल यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याने प्रसिद्धीपोटी माझी प्रतिमा मलीन करण्यासह आर्थिक लाभापोटी हा खटाटोप केला आहे’, असे हेमंत बागुल यांनी माध्यमांना सांगितले आहे.
दरम्यान, हेमंत बागुल यांनी मला मारहाण केली आहे. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. त्यांनी मला गोळी मारण्याची धमकी दिल्याचा दावा दुचाकी चालक फय्याज सय्यद यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘GBS’चं थैमान! २४ रुग्णांवर आयसीयूत उपचार, शहरात नेमकी रुग्णसंख्या किती?
-बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?
-अजित पवार-शरद पवार एकत्र येणार?; दत्तात्रय भरणे म्हणाले…
-पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; ‘किती गेले नी किती राहिले’ची चाचपणी