पुणे : ही देशाची निवडणुक असून गल्लीचा नाही तर दिल्लीचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. आता या निवडणुकीमध्ये दोन बाजू तयार झाल्या आहेत. महाभारताच्या युद्धामध्ये एक पांडवांची बाजू होती तर एक बाजू कौरवांची बाजी होती. पांडवांकडे अनेक सेना, राजे होते. तर कौरवांकडे देखील अनेक राजे, सेना होती. तशाच प्रकारची अवस्था आज आपल्या देशात आहे. एका बाजूला विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे, आठवले साहेबांची रिपाई तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २४ पक्षांची खिचडी आहे.
आपल्याला विचारलं की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सांगतो, परंतु दुसऱ्या बाजूला एक रोज टिव्हीवर येणारा पोपट बोलतो की, पाच वर्ष आम्ही पाच पंतप्रधान देऊ. परंतु आपल्याला १४० कोटी जनतेचा नेता निवडायचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मोठा खेळखंडोबा सुरूय. त्यांच्याकडे नेता नाही, नियत नाही आणि नितीपण नाही. अशी टिका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोविडच्या काळात अनेक मोठे नेते घरी बसले होते. परंतु मुरलीधर मोहोळ महापौर असतांना त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांची सेवा केली आहे. गेल्या दहा नरेंद्र मोदी यांनी पुण्याचं चित्र बदललं आहे. पुण्यामध्ये मेट्रो आली. 20 हजार आपण घर बांधली. चोविस तास पाण्याची योजना आणली. रस्त्यांच्या संदर्भात ट्रॅफिकच्या अडचण सोडवली. सर्व सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होईल. आता अशा प्रकारे नवीन पुणे हे मोदीजींच्या नेतृत्वास तयार होत आहे.
नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये एक चमत्कार केला. गेल्या दहा वर्षात गरिबी रेषेतून लोकांना बाहेर काढलं. हा जगातला एक रेकॉर्ड आहे. ज्याने वीस कोटी गरिबांना कच्च्या घरातनं झोपडीत न स्वतःच्या पक्या घरात आणलं. ज्यांनी 50 कोटी गरिबांच्या घरी गॅस सिलेंडर दिला. त्यांनी 55 कोटी गरिबांना शौचालय दिला. त्यांनी 60 कोटी गरिबांच्या घरी ७० वर्षानंतर पिण्याच्या पाण्याचा नळ पोचवला. ज्याने ८० कोटी गरिबांना 2020 सालापासून त्या ठिकाणी मोफत दोन रेशन दिला. आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. जवळजवळ 64 कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचा लोड मुद्रा योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी दिला. दहा लाखाचं लोन देताना बिना तारण आणि बिना गॅरेंटर्स दिला. असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-‘…पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत’; अजितदादांचा पुन्हा कोल्हेंवर निशाणा
-‘पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही तर…’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले
-‘१३ तारखेला विरोधकांचा बाजा वाजणार’; बारणेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड-शो
-‘जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात’; नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?