पुणे : गेल्या काही दिवासांपूर्वी (मंगळवारी) स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या प्रकरणावरुन संपूर्ण राज्य हादरुन सोडले होते. या प्रकरणात दररोज नवनविन खुलासे होत आहेत. आरोपी दत्ता गाडेने स्वारगेट बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर आता या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता गाडे शिरूर परिसरातील एका लॉजबाहेर बसून, तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा. महिलांवर पाळत ठेवायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवत असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा, अशी माहिती मिळाली आहे.
महिलांचे व्हिडिओ काढून तो ब्लॅकमेल करायचा आणि त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून अनेक पीडित महिलांनी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आरोपी दत्ता गाडेचा महिला अत्याचाराचा आत्मविश्वास वाढला असून त्याने स्वारगेट बस स्थानकात देखील २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर तिने तक्रार दाखवण्याची हिमत केली. सध्या दत्ता गाडे हा पुणे पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर न्यायालयात खटला चालू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काय करायचं ते कर पण… स्वारगेट प्रकरणात धक्कादायक माहिती, पीडितेने जबाबात सगळं सांगितलं
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महिला आयोगाची महत्वाची बैठक; चाकणकर काय म्हणाल्या?
-स्वारगेट अत्याचार: आरोपीच्या जाबाबातून धक्कादायक माहिती समोर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
-‘मी अत्याचार केला नाही, आमच्यात सहमतीने संबंध झाले’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा