पुणे : पुणे शहरात अनेक गुन्हेगारीच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. शहरात चोरी, लूट, भरदिवसा गोळीबार, हत्या, बलात्कार, कोयता गँगची दहशत असे प्रकार सर्सास सुरु आहेत. त्यातच पुण्यात गॅसची चोरी केल्याच्याही घटना काही नवीन नाहीत. अनेकदा गॅस चोरीची घटना समोर आली आहे. असाच गॅस चोरीचा प्रकार परत एकदा उघडकीस आला आहे. गॅस चोरी करताना भीषण स्फोट झाला आहे. गॅसच्या कंटेनरमधून ही चोरी सुरू असताना एकामागोमाग एक स्फोट झालेत. चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेल पिंपळगावमध्ये ही धक्कादायक घटना आज पहाटे पावणे ५ च्या सुमारास घडली.
ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झालेत. आग आटोक्यात आली असली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या गॅसच्या स्फोटात सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. हा गोरखधंदा एका ढाब्याच्या छोट्या हॉटेलसमोर सुरू होता. एका कंटेनरमधून घरगुती आणि कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस चोरी सुरू होती. तेव्हा गॅसचा मोठा स्फोट झाला, ३ ते ४ टाक्या फुटलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत.
स्फोटाने मोठी आग लागली होती. या आगीत ढाब्यासह तिथे पार्क असणाऱ्या इतर वाहनांना ही मोठी आग लागली. गॅस चोरी करताना झालेल्या स्फोटाच्या धक्क्याने आजूबाजूच्या घरांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. शेल पिंपळगावमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारे मात्र पसार झाले आहेत. या घटनेतील आरोपींचा चाकण पोलीस तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘शाहरुख अन् करणचे ‘तसले‘ संबंध’; दाक्षिणात्य गायिकेचा मोठा गौप्यस्फोट
-मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी
-निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?
-‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…