पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते २६ सप्टेंबरला पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय-स्वारगेट या मार्गाचे उद्घाटन होणार होते. परंतु, पावसामुळे नियोजित दौरा रद्द करण्यात आला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार होती. ती देखील होऊ शकली नाही. सभेसाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मंडप घालण्यात आला होता. सभा काही झाली नाही परंतु, महाविद्यालयाच्या मैदानाची चांगलीच दुरावस्था झाल्याचे पहायला मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा पुणे दौरा महत्वाचा असल्याचं सांगितलं जातं होतं. पुणे शहरात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करत राजकीय शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आलं होतं. सभेच्या ठिकाणी मोठा मंडप उभारला होता. शहरातील विविध रस्त्यांचे खड्डेदुरुस्ती, तर मैदानावर खडी टाकून मोठा रस्ता देखील तयार करण्यात आला होता. त्यामुळे आता ही खडी मैदानावर पसरलेली तशीच आहे. पावसामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मैदानात चर काढण्यात आली आहे. यामुळे मैदानाचे सद्यस्थिती बिकट झाल्याचे पाह्ययला मिळत आहे.
मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी स. प. महाविद्यालयाचे मैदान घेतानाच ते पूर्वस्थितीत करून देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार महामेट्रोकडून मैदान पूर्ववत करून देण्यात येणार असल्याचं महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे (Hemant Sonawane)
यांनी सांगितलं आहे. आता मैदान खराब झाल्यामुळे फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, ॲथलेटिक्स अशा खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे महामेट्रोकडून मैदान पूर्ववत कधीपर्यंत करून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ओबीसी-मराठा कार्यकर्त्यांचा ससून रुग्णालयात राडा; २०-२५ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
-जुन्नरमध्ये ठरलं! राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
-‘त्यांच्यासोबत जात मतदान केलं तर तुम्हाला सौ..’; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
-शरद पवारांच्या बैठकानंतर संभाव्य बंड टाळण्यासाठी अजितदादा घेणार कार्यकर्त्यांची शाळा