पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांकडून जय्यत तयारी देखील सुरु आहे. येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय योजनांची घोषणा सरकारकडून केली जात आहे. नागरिकांना विविध सोईसुविधा दिल्या जात आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विकासकामे होत नसल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळत आहे.
हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे गावातील स्मशानभूमी आणि गावातील रस्ते गावच्या नकाशाप्रमाणे मंजूर होऊन देखील ७० वर्षांपासून ही कामे झाली नसल्याने या गावाने येत्या विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. वडगाव शिंदे गावातील कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकाव, अशी आग्रहाची मागणी सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली असल्याची माहिती माजी उपसरपंच गणेश शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासनापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करून देखील गावची समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. वडगाव शिंदे गावामध्ये ७० वर्षांपासून मंजूरी मिळूनही रस्त्याचे आणि स्मशानभूमीचे काम झाले नसल्याने आक्रमक भूमिका घेत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्रामस्थांच्या निर्णयावर सरकार पातळीवर काय निर्णय घेतला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान मोदींचा ‘ती’ खास पगडी घालून होणार होता सन्मान, पण….
-मोदींचा दौरा रद्द; मविआ आक्रमक, उद्याच करणार मेट्रोचं उद्घाटन
-मोदींचा दौरा रद्द, पण अजितदादांनी पहाटेच केली मेट्रोच्या कामाची पाहणी
-ना भाई, ना ताई! कसब्यात काँग्रेसमध्ये वाद पेटला, धंगेकर समर्थकांच्या बॅनरमुळे चर्चेला उधाण
-शरद पवार करणार अजितदादांची कोंडी; ‘त्या’ १२ मतदारसंघात लावली जोरदार फिल्डींग