पुणे : पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे महापालिकेच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुण्याच्या विकासासाठीचे प्रकल्प, पुणेकरांच्या दैनंदिन समस्या या संदर्भात आढावा बैठक झाल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. पुणेकरांचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी काय उपाययोजना आखल्या याबाबतही मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
24X7 पाणीपुरवठा योजना या योजनेमध्ये मग आज नेमकी काय स्थिती आहे किंवा काय प्रगती आहे नद्यांचे दोन्ही प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामध्ये मुळा मोठा नदी संवर्धन योजना सुरू आहे नदीकाठ सुधारण्याचा प्रकल्प सुरू होईल शहरात अनेक ठिकाणी नद्यांवरचे किंवा शहरातल्या वेगवेगळ्या भागातल्या पुलाचे काही प्रकल्प सुरू आहेत. प्रधानमंत्री आवास योजना शहरांमध्ये सुरू आहे. या सोबतच शहरातील नागरी प्रश्नांवरही बराच वेळ आजच्या बैठकीत प्रशासनासोबत चर्चा झाली असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
पुणे महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध १९ प्रकल्पांचा आढावा आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह घेतला. प्रामुख्याने समान पाणीपुरवठा, रस्ते, एचटीएमआर, शहरातील अतिक्रमणे, एसटीपी, प्रधानमंत्री आवास योजना, समाविष्ट गावातील प्रस्तावित प्रकल्प आदींसंदर्भात बैठकीत… pic.twitter.com/Zan8dCMNH6
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 4, 2025
अत्यंत महत्वाची अशी योजना म्हणजे 24X7 पाणीपुरवठा योजनेतून जवळपास 86 टाक्याचे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं आज त्यातल्या जवळपास 66% पूर्ण झाले आहे. 22 टक्यांची काम सुरू आहेत. आणि 25 जूनपर्यंत या टाक्यांची काम पूर्ण होते अशा पद्धतीचे नियोजन निवेदन प्रशासन केलं. 102 कि.मी.ची मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकणं अपेक्षित होतं. त्यामध्ये 92 किलोमीटरच्या वाहिनीचं काम आता पूर्ण झालं आहे. 2 लाख 32 हजार मीटर आपल्याला वॉटर मीटर बसवायचे होते. त्यामध्ये आज 1 लाख 68 हजार वॉटर मीटर बसून तयार झाले आहेत. शिवाय ही योजना आता समाविष्ट गावांमध्ये सुद्धा पुढच्या काळामध्ये सुरू होत आहे. त्यामुळे मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी पुणे शहराला मिळावं म्हणून पालिका प्रशासनाकडून तसेच वैयक्तिक आम्ही देखील केली आहे, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान! पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा
-वाल्मिक कराडसोबत व्हायरल फोटोवर सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘आमचे त्यांच्याशी संबंध…’
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोघांना बेड्या; आमदार रोहित पवार म्हणाले, ‘या महाराष्ट्रात…’
-पुण्यात डॉक्टरने घातली पालिकेला टोपी; पण असं फुटलं बिंग…
-संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, वॉन्टेंड आरोपींना पुण्यातून अटक