पुणे : भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नीला शहरातील नामांकित रुग्णालयामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. १०-२० लाख डिपॉझिटची मागणी करत उपचार नाकारल्याने गर्भवती तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्वत: आमदार अमित गोरखे यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची मागणी होत आहे.
तनिषा यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ सदस्यांची ‘हाय लेव्हल कमिटी’ स्थापन केली होती. या समितीमध्ये डॉ. राधाकिशन पवार, डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. नागनाथ यम्पल्ले, डॉ. निना बोराडे, डॉ. कल्पना कांबळे या डॉक्टरांचा समावेश आहे. या समितीने शुक्रवारी रुग्णालयाला भेट देली आणि तनिषा मृत्यू प्रकरणाचा अहवाल तयार केला असून आता हा अहवाल सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे सत्य आजच सगळ्यांसमोर येण्याची शक्यता आहे.
हे प्रकरण तापल्याचे पाहून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने देखील आपली समिती स्थापन करून या घटनेचा तपास केला. यामध्ये रुग्णालयाची चूक नसून डिपॉझिट मागितल्याच्या रागातून तक्रार करण्यात आल्याचा निष्कर्ष रुग्णालय समितीने काढला होता. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय सल्लेही मानले नाहीत, असंही निष्कर्षात सांगण्यात आले होते. यावरुन रुग्णालयावर पुन्हा संताप व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या समितीने सरकारकडे अहवाल सादर केला असून सत्य बाहेर येण्यापूर्वीच रुग्णालयाकडून यापुढे कुठल्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेतले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निष्पाप जीव गेल्यानंतर दीनानाथ हॉस्पिटलला उपरती, रुग्णांसाठी घेतला मोठा निर्णय
-‘मी पण माझी पोरगी गमावली, आंदोलन करुन बसले काहीही झालं नाही’; रुग्णालयाबाहेर आईची प्रतिक्रिया
-‘रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; काँग्रेसकडून रुग्णालयाच्या बोर्डावर शाईफेक
-मंगेशकर रुग्णालयाची स्वतःलाच क्लीनचीट, ‘ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी…”