पुणे : पुणे महानगरपालिकेने आर्थिक दुर्बळ घटकांसाठी बांधलेल्या सुमारे एक हजाराहून अधिक सदनिका सध्या वापराविना पडून आहेत. योग्य देखभालीअभावी आणि सुरक्षेअभावी या सदनिकांची दुरवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. पालिकेने बांधलेल्या सदनिकांपैकी हजारो सदनिका रिकाम्या असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.
दुरावस्थेत असलेल्या सदनिकांमधील नळ, बेसिन (भांडे) आणि इतर साहित्य चोरीला गेले आहे. दरवाजे आणि खिडक्यांचीही मोडतोड झाली आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांचे फावत असून, लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या सदनिका धूळ खात पडून राहिल्याने मूळ उद्देशच धोक्यात आला आहे. पालिकेने बांधलेल्या सदनिकांमध्ये चोरीच्या घटना घडल्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या मालमत्तेचा उद्देश सफल होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
किती रिक्त सदनिका आहेत?
महापालिकेकडे विविध योजनांतर्गत एकूण ३,६८९ EWS सदनिका उपलब्ध आहेत. यापैकी तब्बल १ हजार ८९ सदनिका सध्या रिक्त असल्याची माहिती आहे. सर्वाधिक रिक्त सदनिका महंमदवाडी ४४८ आणि हडपसर २७४ परिसरात आहेत. धानोरी ९८, खराडी ४९, सय्यदनगर ५३, चंदन नगर ३०, कळस ४२, वडगाव बुद्रुक २१, बावधन बुद्रुक ११, हिंगणे खुर्द १७ आणि एरंडवणे २२ या भागांमध्येही अनेक सदनिका रिकाम्या पडून आहेत. या सर्व सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
-‘आरटीई’ प्रवेशाची आज शेवटची संधी! आजच आपल्या मुलांचे अॅडमिशन फिक्स करा
-वॉटर पार्कला जाताना काळजी घ्या! झीपलाईन करताना तरुणीचा पाय घसरला अन्…
-पुण्यात काँग्रेसला आणखी मोठा धक्का; हर्षवर्धन सपकाळांकडे आणखी एक राजीनामा
-‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही…’; शरद पवारांच्या आमदारांची प्रतिक्रिया
-‘देवेंद्र फडणवीसांमुळेच संग्राम थोपटे हे…’; हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?