पुणे : पुण्यातील मुख्य बसस्थानक असलेल्या स्वारगेट बस डेपोमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेने शहरासह संपूर्ण राज्य हादरुन गेले होते. अशातच आरोपी दत्ता गाडे याचे वकील सहाय्यक साहिल डोंगरे यांचे अपहरण करून दिवे घाटात नेले व तेथे मारहाण केल्याचा दावा केला आणि हडपसर पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी या संदर्भात तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
साहिल डोंगरे यांच्यासोबत अपहरणाचा कोणताही प्रकार घडला नाही तर अॅड. साहिल डोंगरे हे दारू पिऊन बाहेर पडले व मोटारसायकलवरून जात असताना बाईकवरून पडून जखमी झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. डोंगरे यांनी केलेल्या तक्रारीने पोलिस प्रशासनाने तात्काळ तपासाला सुरवात केली. मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमधून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले. डोंगरे हे ज्या बिअर बारमध्ये होते तेथील सीसीटीव्ही फूटेज हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
साहिल डोंगरे आणि त्यांचा मित्र अनिकेत मस्के हे गाडीतळ येथील सागर बारमध्ये १७ मार्च रोजी रात्री १० वाजता गेले. तेथून बाहेर पडताना ते सीसीटीव्हीत दिसत आहेत. बारमधून अनिकेत मस्के हा घरी गेल्याचे सांगत आहे. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डोंगरे हे रात्री साडेअकरा ते १८ मार्च पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान दिवे घाट येथे असल्याचे दिसून आले. डोंगरे यांनी १८ मार्च रोजी स्वतः १०८ वर कॉल करून अपघात झाल्याचे सांगितले.
दरम्यान, डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असून ते स्वारगेट बसस्थानक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलासोबत ते काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. डोंगरे यांनी अपहरण आणि मारहाण झाली असल्याचा बनाव का केला असेल? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान! पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, उल्लंघन केल्यास…
-दत्ता गाडेच्या वकिलाचे खरंच अपहरण? ‘त्या’ सीसीटीव्ही फूटेजमधून धक्कादायक माहिती समोर
-मोठी दुर्घटना! पुण्यातील हिंजवडीत टेम्पोला आग; चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत
-दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा-