पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे लोकप्रिय नेते दिवंगत गिरीश बापट यांनी विकासगंगा आणली आणि जनतेला विकासाचा आरसा दाखवला. स्व. गिरीशभाऊंचा तोच वारसा आता भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने पुढे चालवताना दिसत आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात आजही ज्येष्ठ जाणत्या व्यक्तींच्या तोंडी गिरीष बापट यांचेच नाव येते. बापट यांच्या पावलावर पाऊल ठेवून हेमंत रासने हे वाटचाल करत असल्याचा उल्लेख आणि गौरवही काही जणांनी केला आहे.
कसब्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अनेक समस्या भाजपच्या नेत्यांनी सोडवल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, शौचालये, रस्त्यावरील दिवे आणि कसब्याच्या गल्ली-बोळातील रस्ते यांची उदाहरणे दिली गेली. या प्राथमिक गरजा आणि त्यातून उद्भवलेल्या समस्या याकडे स्व. गिरीश बापट यांच्या पाठोपाठ हेमंत रासने हे देखील लक्ष घालत असल्याचा दाखला अनेकांनी दिला.
कसबा विधानसभा मतदारसंघ हा गेली कित्येक वर्षे भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधीकडे आहे. येथील समस्यांचा सकारात्मक दृष्टीने विचार केला आणि सोडवणूक केली गेली, त्यामुळे येथील चोखंदळ मतदार योग्यच प्रतिनिधी निवडून देतात. कसब्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी नेहमीच भाजपच्या प्रतिनिधींनी घेतली आहे. त्या दृष्टीने सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा अद्ययावत करण्याकडे भर दिला आहे, किंबहुना, त्या सुधारणांसाठी मोठा निधीही उपलब्ध करून दिला आहे. स्व. मालतीताई काची यांच्या नावाने गाडीखाना दवाखान्यात सर्व सुविधानी युक्त असे प्रसूती गृह बांधले गेले तर कमला नेहरू रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी मोठा निधी मिळवला गेला आणि त्या दृष्टीने कामही पूर्ण झाले आहे. काहींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे हे सर्व होत असताना या कामांना आत्ताचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या गोष्टीचा अनेकांनी तीव्र शब्दात निषेधही केला.
भाजपचा उमेदवार निवडून आला असताना कसबा मतदार संघात रस्त्यांची निर्मिती झाली, त्यात सुधारणा झाली, रस्त्यांचे डांबरीकरण काँक्रिटीकीकरण झाले. अगदी अंतर्गत भागात असलेल्या गल्ल्यांमधील रस्ते ही सुरळीत झाले. भाजपच्या काळात सगळीकडे पार्किंग व्यवस्थेचा हा प्रश्न सोडवून पार्किंगचे मोठमोठे स्टेशन उभे करण्यात आले. त्यात प्रामुख्याने आर्यन पार्किंग, सतीश मिसाळ पार्किंग, क्रीडा महर्षी साने सर पार्किंग, शिवाजीराव आढाव वाहनतळ अशा पार्किंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली असून वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न झाले. कसबा विधानसभा मतदार संघातील नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधींवर आणि त्यांच्या कामकाजावर खुश असून येथून भाजपाचा उमेदवार विजयी होईल अशी खात्री सर्वजण देत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘चंद्रकांत दादांमुळे मुलींना मोफत शिक्षण’; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांकडून कौतुक
-पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कूल उभारणार- आबा बागुल
-सुरक्षित पुण्यासाठी महायुतीचं मोठं पाऊल; नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ६० कोटींचा निधी
-Assembly Election: पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा; ड्रोन, पॅराग्लायडर उडवण्यास बंदी
-मविआचे उमेदवार अजित गव्हाणेंच्या वक्तव्याने नवा वाद; संतपीठावरील संचालकांचे ‘कॅलिबर’ काय?