पुणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आता सर्व पक्षांची तयारी सुरु आहे. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संजय राऊतांचे कान टोचले आहेत.
‘पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची काँग्रेस सोबत आघाडी कायम राहणार आहे.
आव्हानात्मक काळात संजय राऊत यांनी मांडलेली “करून तर पाहू” ही भूमिका केवळ दुर्दैवी नाही, तर भारतीय जनता पार्टीला थेट मदत करणारी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निष्ठेने भारतीय जनता पार्टीचा सामना करणाऱ्या शिवसैनिकांचाही हा विश्वासघात आहे’, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. जे होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावयाचंच आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही तर त्याचा फटका पक्षाला तसचे पक्षवाढीला होत असतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत केले पाहिजेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागची वेळी वेगळेवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. सगळीच जर इलेक्शन्स आपल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी नाय मिळणार? हे त्यांचंही इलेक्शन आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी संजय राऊतांच्या सुरात सूर मिसळला तर दुसरीकडे प्रशांत जगतापांनी संजय राऊतांचे कान टोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम…’; अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना
-पुण्याला २ हजार कोटींचा निधी द्या; काँग्रेसची अर्थमंत्री पवारांकडे मागणी
-बारामतीत पवार काका-पुतणे एकाच मंचावर; राजकीय घडामोडीकडे राज्याचं लक्ष
-‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा