पुणे : पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठी गळती लागत असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. अशातच आता काल महिला आघाडीच्या ३२ महिला कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले. महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी ‘पक्षाच्या महिला आघाडी नियुक्त्यांवर आम्ही सर्व नाराज असून पक्षाचा राजीनामा देत आहे’, असे पत्र लिहीत महिला आघाडीने नाराजी व्यक्त केली. हे पत्र आज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता हे पत्र फेक असल्याचा दावा शहरप्रमुखांकडून करण्यात येत आहे.
महिला आघाडीच्या राजीनामा दिलेल्या महिलांनी पत्रावर नावे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर या महिला पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्याशी संपर्क केला असता ‘असे राजीनाम्याचे पत्र आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही’, असे थरकुडेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
‘पक्षाचे लेटर हेड काढून कोणीही अशा पद्धतीचा खोडसाळपणा करू शकतो, या पत्रावर महिला आघाडी असे नमूद करण्यात आले असले तरी त्या ठिकाणी कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्याचे नाव लेटरहेडवर असल्याचे पाहायला मिळत नाही. या पत्रामध्ये स्वाक्षरी असल्याचा काही महिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचं आपल्याला सांगितलं आहे’, असा दावा गजानन थरकुडे यांनी केला आहे. त्यामुळे राजीनामा नाट्यामागचं सत्य नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्या’ रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
-टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल
-पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे
-‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका