पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण त्यानंतर शहरात ड्रग्ज तस्करीचे वाढते प्रमाण, नाईट लाईफ, हॉटेल्स, बारमध्ये या सगळ्यांवर पुणे पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत दहशतवादी संघटनांशी संबधित अनेक जणांना ताब्यात घेऊन कारवाया करण्यात आल्या.
शहरातील हॉटेल्सवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारुन देखील हॉटेल चालक मात्र त्यांच्या व्यवस्थापनात काहीही बदल करताना दिसत नाहीत. यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका हॉटेलला नोटीस बजावली आहे. त्यामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याचा इशारा देऊन कारभार सुधारण्याचे आवाहन केले आहे.
सतत गर्दी होत असल्यामुळे या हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेकदा नोटीस बजावल्या आहेत. हॉटेलमधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला आहे. या हॉटेलमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा घालत असतात. सध्या अतिरेकी कारवाया बाबत अलर्ट आहे. एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून त्यातून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा पोलिसांनी पत्राद्वारे दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अरविंद शिंदेंचा मास्टर प्लॅन; ठाकरेंचा शिवसैनिक गळाला लावत बागवेंवर मोठी कुरघोडी
-‘शिवस्वराज्य यात्रे’च्या मंचावर अजित पवारांच्या माजी आमदाराच्या पत्नीची उपस्थिती; नेमका काय प्रकार?
-बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत आले तर? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासाठी चांगल्या लोकांनी…’
-राज्य मंडळाच्या शुल्क परताव्यात तांत्रिक अडचणी; विद्यार्थ्यांना शुल्क परतावा कधी मिळणार?
-शरद पवार भाजपला धक्का देणार?; भाजपचे संजय काकडे पोहचले शरद पवारांच्या भेटीला