पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला अटक झाली असून हे प्रकरण सध्या पुणे सत्र न्यायालयामध्ये सुरु आहे. या स्वारगेट प्रकरणाने शहरासह राज्य हादरुन गेले. या प्रकरणी अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले. तसेच अत्याचार होत असताना पिडित तरुणीने आरडाओरडा केला नाही का, तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही का, असे प्रश्न उपस्थित झाले होते. या शिवशाही बसची शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आली असून यासंदर्भात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्वारगेट एसटी बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधून आवाज बाहेर येतो किंवा नाही, याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली. या पंचनाम्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ध्वनितंत्रज्ञ उपस्थित होते. अत्याचार झालेली शिवशाही बस वातानुकूलित असल्यामुळे त्याच्या काचा बंद होत्या. त्यामुळे आवाज बाहेर ऐकू गेला नाही. या पडताळणीमधून आरोपी दत्ता गाडेच्या विरोधात आणखी एक भक्कम पुरावा जमा झाला आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणी पुणे पोलिसांनी बसमध्ये प्रत्यक्ष ध्वनिप्रयोग देखील करून पाहिला. यामध्ये बसमधून मोठ्याने आवाज केल्यास तो बाहेर ऐकू जातो का? याची तपासणी यावेळी करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा शास्त्रोक्त पंचनामा झाला. प्राथमिक अहवालानुसार, बस वातानुकूलित असल्याने बाहेर आवाज ऐकू आला नाही, असे निष्पन्न झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! बसला लागलेली आग अपघात नव्हे तर नियोजित कट; कोणी घडवून आणला हा प्रकार?
-बारामती नगरपरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
-वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?