पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत होते. पुणे सत्र न्यायालयामध्ये हा खटला सुरु असून आता याबाबत या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गोडेचे वकील साहिल डोंगरे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी हडपसर येथून डोंगरे यांचे अपहरण करुन त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मारहाण झाल्यानंतर दत्ता गोडेचे वकील साहिल डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ॲडव्होकेट डोंगरे यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साहिल डोंगरे हे दत्ता गोडेचे वकील वाजीद खान यांचे सहायक वकील आहेत.
दरम्यान, या पुणे सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी ‘आरोपी दत्ता गाडेने पीडित तरुणीला 7500 रुपये दिले . याबाबत न्यायालयात युक्तीवाद झाला’, असे वकिलांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर पीडित तरुणीवर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. मात्र, त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर वकिलांनी माध्यमांसमोर ‘आम्ही असं काही म्हटलं नाही’, असं वक्तव्य केलं. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी माध्यमांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता या अॅडव्होकेट डोंगरे यांच्यावर नक्की कोणी हल्ला केला असेल? आणि कोणत्या कारणामुळे त्यांच्यावर हल्ला झाला? आरोपी दत्ता गाडे प्रकरणावरुन की अन्य कोणत्या कारणावरुन हल्ला झाला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-गावातील समलैंगिक संबंध ठरलं त्याच्या शेवटाचं कारण; गोड बोलून भेटायला बोलवलं अन्…
-पोर्शे कार प्रकरणाची सुनावणी लवकरच सुरु होणार; सरकारी वकील कोण असणार?
-तृप्ती देसाई बीडमध्ये दाखल; ‘त्या’ 26 अधिकाऱ्यांविरोधातले पुराव्यांचा पेन ड्राईव्ह केला सादर
-‘त्यांनी ‘जय शिवराय’ नाही, तर ‘अल्ला हू अकबर’ म्हणावं’; नितेश राणेंनी राष्ट्रवादीला डिवचलं
-पत्नी आमदार तरीही पतीदेवांना विधान परिषदेची लॉटरी, अजितदादांचा पुण्यातील नेत्यांना ठेंगा