पुणे : भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील फाटा ते वनविभाग कमान या देवास्थानकडे जाणाऱ्या साडे सातशे मीटरचा रस्त्याची प्रचंड दूरावस्था झाली आहे. तो रस्ता क्रॉक्रीटीचा करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणासाठी बसल्या आहेत. सुप्रिया सुळे या आज सकाळपासून उपोषण करत ठिय्या आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलायाबाहेर बसल्या आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यास अद्याप आले नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळत आहे.
📍जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ⏭️ 09-04-2025 ➡️ भोर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात उपोषण – लाईव्ह https://t.co/hbvV0sBt9o
— Supriya Sule (@supriya_sule) April 9, 2025
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“केंद्र सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळतो. त्याबद्दल केंद्राचे आभार मानते. पण भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान हे अंतर जवळपास साडे सातशे मीटरचे आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून तो रस्ता करण्यात यावा, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. ही दुर्दैवी बाब असून त्यामुळे आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा मार्ग अवलंबून कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनाला बसले आहे. तसेच जोवर रस्त्याचा प्रश्न सुटत नाही. भले ३० तास का होईना, तोपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणाहून उठणार नाही, अशी भूमिका मांडत सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल
-पुण्यात ठाकरेंना मोठा धक्का; महिला आघाडीने दिले धडाधड राजीनामे
-‘अनामत रक्कम घेण्याचा रुग्णालयांना अधिकार’; इंडियन मेडिकल असोसिएशनची बैठकीत भूमिका
-‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक