पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्ष नेते तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अनेक मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची नावे देखील समोर येत आहेत. नुकतेच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) सोशल मिडिया शिबीर पार पडले. या शिबीराला पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षात येणाऱ्या आमदारांबाबत सुरु असलेल्या चर्चेवरून भाष्य केले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“जी लोक गेल्या दीड वर्षांपूर्वी पक्ष सोडून गेले त्या लोकांसाठी माझ्या फोनचे इनकमिंग नेहमी सुरु आहे. मी कोणालाही ब्लॉक केलेले नाही. ही लढाई वैयक्तिक नसून, वैचारिक आहे. मी कोणशीही कधीही संबंध तोडले नाहीत. माझे सर्वांशी बोलणे आजही सुरु आहे”, असं सुप्रिया सुळे आगामी काळात पक्ष सोडून गेलेले आमदार घर वापसी करणार का? याबबत बोलताना म्हणाल्या आहेत.
“सर्वांनी पाहिलंच असेल गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात पक्षफुटीचं राजकारण झालं. यामध्ये पक्ष कुठं होता, चिन्ह कुठं होतं, आमदार, खासदार देखील सत्तेच्या मागे पक्ष, चिन्ह घेऊन निघून गेले. परंतु, आम्ही या महाराष्ट्राच्या जनतेच्या साथीने लढत राहलो.’सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नहीं’ मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानते, कारण जनतेला समजलं शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे. यामुळे जनतेने दाखवून दिलं की, देश संविधानावर चालतो” असंही सुप्रिया सुळे पक्षफुटीबाबत बोलताना म्हणाल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय
-पंतप्रधान मोदींची सभा नाही, पण मैदानाची चांगलीच दुरावस्था झाली
-ओबीसी-मराठा कार्यकर्त्यांचा ससून रुग्णालयात राडा; २०-२५ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
-जुन्नरमध्ये ठरलं! राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार