पुणे : एकीकडे दिल्लीतील विधानसभा निवडणुकींच्या निकालाची चर्चा आहे तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा पालकमंत्री पदांची पुनर्रचना करणार असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रिपदांना स्थगिती देण्यात आली होती. यावरून महायुतीत शिवसेना आणि अजित पवार गटात नाराजीचा सूर राज्यभर उमटल्याने येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत अनेकांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत देत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
“दादा बोलले असतील महापालिका निवडणूक स्वबळावर लढलो तर ते फायनल रायगड नाशिकवर लवकर निर्णय घेतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेणार आहेत”, असेही सुनील तटकरे म्हणाले आहेत. सुनिल तटकरे आज पुण्यातील पत्रकारांशी बोलत होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून डिपॉझिटही जप्त झाले आहे. यावर सुनील तटकरे यांनी दिल्लीत भाजपला जनतेने संधी दिली याबद्दल सर्व नेत्यांचे अभिनंदन केले. पराभूत होणाऱ्या पक्षाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं. आम्ही लोकसभेला पराभव स्वीकारला होता. आता ईव्हीएमवर दोष न देता पराभव स्वीकारावा, असेही सुनील तटकरे म्हणाले आहे.
आणखी काय म्हणाले सुनील तटकरे?
“मी अनेकदा स्पष्ट केला आहे की देशमुख यांची हत्या निर्घृणपणे झाली आहे. त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. दोशी लोकांवर कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणातला मास्टरमाइंड शोधून काढावा, ही आमची मागणी आहे. या घटनेचा तपास महत्त्वाचा असून याबाबत तीन समित्या नेमल्या आहेत. यंत्रणा तपास करत आहेत. मास्टरमाइंड शोधून काढावा. दोषींवर कठोर कारवाई व्हावी”, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Delhi Vidhansabha: “…तर भाजपच्या २० जागा आल्या नसत्या”, शरद पवारांच्या आमदाराचं मोठं वक्तव्य
-आई म्हणावं की कसाई; पोटच्या चिमुरड्यांचा गळा आवळला, अन्…
-पुण्याच्या गुन्हेगारीला बसणार चाप; पुणे पोलिसांनी आखली ‘ही’ मोठी योजना
-पोलीस दलात मोठी खळबळ; पीएसआयने संपवलं जीवन, नेमकं कारण काय?
-ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच ‘या’ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, ठाकरेंचा ‘मास्टर प्लान’ काय?