पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पुलाच्या बांधकामासाठी नाममात्र दराने जागा देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जवळपास ७९५ चौ. मीटर क्षेत्रफळ असणारी जमीन केवळ एक रुपया वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. रुग्णांना लाखोंचे बिल आकारणाऱ्या हॉस्पिटलला कवडीमोल किमतीत जागा देण्याची मेहरबानी राज्य सरकारकडून दाखवण्यात आल्याने पुणेकरांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एरंडवणे भागामध्ये असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी वार्षिक भाडेपट्ट्याने जमीन नाममात्र दराने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ट्रस्टला यापूर्वी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौजे एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. या शिवाय ट्रस्टने कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान नाला बांधण्यात येणार असून यासाठी राज्य सरकारकडून ही जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
✅म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 18, 2025
या नाल्यावर पूल बांधण्यासाठी ७९५ चौ. मीटर जमीनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टकडून करण्यात आली होती. याला वार्षिक नाममात्र १ रुपया दराने देण्यास मंजूरी मिळाली आहे. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना ये-जा करणे सूकर असा दावा केला जात आहे.
पुण्यातील प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा समावेश आहे. सामान्य नागरिकांना येथे उपचार घ्यायचे असल्यास रुग्णाला बेड मिळण्यापासून सामना करावा लागतो. उपचारासाठी लाखोंची बिल देखील आकारले जाते. त्यामुळे राज्य सरकारने करोडोंची जमीन केवळ एक रुपया नाममात्रदाराने का दिली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तानाजी सावंतांना धक्का; फडणवीसांच्या एका आदेशात सरकारी सुरक्षा हटवली
-पुणे पालिकेत ‘भाजप केंद्रित’ अंदाजपत्रक?; महाविकास आघाडीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
-Pune GBS: पुण्यात जीबीएस आजाराच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या किती?
-शरद पवारांच्या ‘त्या’ आमदारानं घेतली अजित पवारांची भेट; नेमकं कारण काय?