पुणे : राज्यात महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या महापालिका निवडणुकीसाठी हालचाली सुरु आहेत. पालिका अधिकारी आणि कर्माचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूरमध्ये सर्व पालिका कर्माचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे.
साधारण मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांची सुनावणी होणार असल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून डीजीटल मॅपींगसाठी नव्याने विकसीत होणाऱ्या महापालिका प्रभागरचनेसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण नागपूरमध्ये होणार असून पालिकेच्या अधिकारी आणि कर्माचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दरम्यान, प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण तसेच वेगवेगळ्या २० ते २२ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर न्यायालयाने निर्णय दिला असता तर निवडणुकीचा मार्ग आजच मोकळा झाला असता. राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितीच्या निवडणुक गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायलयात सुनावणी कधी होणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘जर रस्ता व्हावा ही इच्छाच असती तर….’, सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर अजितदादांचा टोला
-ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; शहरप्रमुख म्हणाले, ‘राजीनाम्याचे पत्रच फेक’
-‘त्या’ रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
-टेस्ट ट्यूब ट्रीटमेंटने जुळी मुलं झाली, पण बाळांचे वजन वाढेना; आईने उचलेले धक्कादायक पाऊल