पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांची खरेदी-विक्री, सेवन असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. अशातच २ दिवसांपूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध पबमधील टॉयलेटमधील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अंतर्वस्त्रे, वापरलेले कंडोम्स पडले होते. त्यानंतर आता पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहामध्ये दारुच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे तसेच अमली पदार्थ सापडले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगरेट पाकिटे तसेच अमली पदार्थ मिळून आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीकडून करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील मद्य आणि सिगरेट पाकिटे आढळल्यानंतर आता विद्यापीठाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विद्यापीठाने या प्रकरणी ३ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई केली आहे. इतकचं नव्हे तर ज्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील खोल्यांमध्ये हे आढळून आले होते. त्या विद्यार्थिनींच्या पालक आणि विभाग प्रमुखांकडून यापुढे असे कृत्य होणार नाही याची लेखी हमी घेण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान! पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, उल्लंघन केल्यास…
-दत्ता गाडेच्या वकिलाचे खरंच अपहरण? ‘त्या’ सीसीटीव्ही फूटेजमधून धक्कादायक माहिती समोर
-मोठी दुर्घटना! पुण्यातील हिंजवडीत टेम्पोला आग; चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत
-दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचा अनोखा ‘The White Lotus’ थीम वाढदिवस सोहळा-
-सोशल मीडियावर मैत्री पडली महागात; ६ जणांनी बोलावून घेतलं, त्याचे नग्न व्हिडिओ, फोटो काढले अन्…