पुणे : मंचर येथील माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव विकास बाणखेले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विकास बाणखेले यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. विकास बाणखेले यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. विकास बाणखेले यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
नेमकं काय घडलं?
विकास किसनराव बाणखेले नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी गावात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांबरोबर गप्पा मारून ते घरी गेले. ते जेवणासाठी साडे अकरा वाजता आले नाही म्हणून त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि लाला अर्बन बँकेचे संचालक रामदास बाणखेले यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. परंतु आवाजाला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून डोकावले असता त्यांना विकास बाणखेले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यानंतर मंचर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
त्यानुसार मंचर पोलिसांनी रामदास बाणखेले यांच्या फिर्यादीनुसार विकास बाणखेले यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिस हवालदार तानाजी हगवणे यांनी दाखल केला असून विकास बाणखेले यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केला होता. आत्महत्येचं नेमकं कारण काय? याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार सुमित मोरे करत आहे. विकास बाणखेले हे लाला अर्बन बँकेत लेखनिक म्हणून काम करत होते.
महत्वाच्या बातम्या-
-Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?
-दुचाकी चालकाला अरेरावी अन् मारण्याची धमकी? नेमकं काय घडलं, बागुलांनी स्पष्टचं सांगितलं
-पुण्यात ‘GBS’चं थैमान! २४ रुग्णांवर आयसीयूत उपचार, शहरात नेमकी रुग्णसंख्या किती?
-बिगारी कामगाराच्या झोपडीत ५ लाखांची रोकड जळून खाक; झोपडीत इतके पैसे आले कुठून?