पुणे : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता धनकवडे यांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे. याच शहरातून असे प्रकार समोर येत असल्याने आता पुरेगामी महाराष्ट्रातून असे प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
धानक्का चव्हाण या संशयित महिलेने काळी जादू करण्याचा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या महिलेने या आधीही काळी जादू केल्याचे बोलले जात आहे. गेल्या ४ महिन्यांपासून धनकवडी परिसरामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या घराबाहेर तिने असे प्रकार केले असून आता थेट माजी महापौर धनकडवडे यांच्या घराबाहेर हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे सरचिटणीस असणाऱ्या दत्ता धनकवडे यांच्या धनकवडी परिसरात बंगल्याबाहेर हा अघोरी प्रकार घडला आहे. ४५ वर्षीय धानक्का चव्हाण जादूटोणा करणाऱ्या संशयित महिलेविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ४ महिन्यांपासून ही महिला काळी जादू करण्याचे प्रकार करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या महिलेने थेट माजी महापौरांच्या घराबाहेर हा घाणेरडा प्रकार केल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रमाजान ईदनिमित्त शहरातील ‘या’ भागातील वाहतूकीत बदल
-मुंडेंनी मुलांचा स्विकार केला पत्नीचा का नाही?, तृप्ती देसाईंचा आक्रमक सवाल
-आमदार झाल्यानंतर पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात हेमंत रासनेंची प्रभावी कामगिरी
-आपलं नपुंसकत्व लपवण्यासाठी मित्रालाच आणलं घरी अन्…. पुण्यातील धक्कादायक प्रकार
-मुख्यमंत्री अन् सरकार काय बोळ्याने दूध पितात का? अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण?; उदयनराजे आक्रमक