पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी काल त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गिरीष महाराज यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठीवरुन त्यांनी अर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोरेंचा गेल्या २० दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता आणि येत्या २० एप्रिलला त्यांचा विवाह देखील होणार होता. विवाहाला दोन महिने उरले असतानाच त्यांनी आपले जीवन संपवले.
शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्ठ्या लिहिलेल्या असून अनेक चिठ्ठ्यांमध्ये त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला आहे. त्यातच त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या नावाने देखील एक चिठ्ठी लिहिली आहे. अन्य दोन चिठ्ठ्या त्यांनी त्यांचे आई-वडील आणि मित्रांच्या नावे लिहिल्या आहेत.
लाडाची पिनू…
“माझी लाडाची पिनू, प्रियांका… खरं तर तुझा आता कुठं हात पकडला होता. आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणी मी जातोय. तुझ्यासोबत थोडा काल घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे. मी हात जोडून माफी मागतो. माफ कर. आयुष्यात सर्वांत जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे. तुला न्याय देऊ शकलो नाही. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस. माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला, तर माझी वाट पाहिलीस, माझ्या संघर्षात उभी राहण्याऱ्या माझ्या सखे माझ्या चांगले वेळेची हकदार होतीस तू. माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय.”
कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू. तू खूप गोड आहेस. निस्वार्थी आहेस. खूप काही बोलता येईल. जप स्वत:ला. एवढा काळ थांबलीस. आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको. पुढे जा. खूप मोठी हो. आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो. माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या. मला माफ कर… तुझाच अहो.. शिरीष”, असे शिरीष मोरे महाराजांनी आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी लिहलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या ‘मिशन पुणे’ला ठाकरे देणार टक्कर; पुण्यासाठी आखला खास प्लान, नाराजांना रोखण्यात यश येणार?
-मोठी बातमी: संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने उचललं मोठं पाऊल; अवघ्या ३०व्या वर्षी संपवलं जीवन
-गळती धरणाला की निधीला? बांधण्यासाठी लागलेला खर्चापेक्षा दुरुस्तीलाच अधिक निधी