पुणे : राज्यात एकीकडे गणेशोत्सव सुरु आहे तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटप अद्याप झालेलं नाही. पुण्यातील ८ मतदारसंघापैकी शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे.
महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यातील हडपसर विधानसभा निवडणुकीची जागा मिळण्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आढावा बैठकीत चाचपणी करण्यात आली असून, शिवसेनेचे खासदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे गणपतीनंतर लगेच पुणे दौरा करणार आहेत.
शिवसेनेने शहरातील हडपसर, वडगावशेरी आणि खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघ घ्यावेत, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. मात्र, या ३ जागांऐवजी केवळ हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे. याचा शिवसेनेचे सचिव संजय मालशेकर यांनी शहरात आढावा घेतला. त्या वेळी हडपसर विधानसभा मतदारसंघात तयारी करण्याची सूचनाही त्यांनी केली. शिवसेनेला पुण्यातील ८ पैकी ३ जागांची आशा असलेल्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीला घराबाहेर पडताना आधी हे वाचाच, शहरातील वाहतुकीत मोठा बदल
-हडपसर विधानसभेतून चेतन तुपेंचा पत्ता कट? नाना भानगिरेंना संधी मिळण्याची शक्यता
-पॅरॉलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांचे बक्षिस