पुणे : पुण्यात आज आरोग्य भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत नवीन २० रुग्णालयाचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. आबिटकरांनी अजित पवारांचं कौतुक करत त्यांच्या व्यक्त होण्याच्या शैलीचे कौतुक केल्याचे पहायला मिळाले आहे.
“त्यांच्या कामाची पध्दत, वेळ आणि जी गोष्ट आवडली नाही. त्यावर तिथेच रिऍक्ट होतात असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात. आजही दादांनी परीक्षा घेतली की, सकाळी आठ वाजता ते आले. दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते. राज्याची आरोग्य यंत्रणा आम्हाला सुधारायची आहे. पुणे हे आरोग्य विभागाचं दुसर सेंटर आहे. अनेक योजनाची अंमलबजावणी पुण्यातून होते. कामकाज होत होतं, पण एकत्रित कार्यालय नसल्याने अडचणी येत होत्या, म्हणून हे नवं भवन आज उभारत आहोत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे ४३ रुग्णालये सुरू करत आहोत”, असे आबिटकर म्हणाले आहेत.
“पुण्यात ७ दवाखान्यांचे उद्घाटन आपण करत आहोत. आरोग्य विभागात सगळी कामे जलदगतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. अजितदादा एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडली नसेल तर तुम्ही कुठलाही विचार न करता समोर कोण आहे न बघता तिथेच रिऍक्ट होता असे तुम्ही एकमेव राजकारणी आहात”, असेही आबिटकरांनी बोलताना म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-पहलगाम हल्ला: सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई; पोलिसांनी ‘त्या’ दोघांची घरे उडवली
-बारामतीचं शिष्टमंडळ अडकलं काश्मीरमध्ये; अजितदादांचा केंद्रीय मंत्री मोहोळांना फोन
-“माझ्या नवऱ्याचा चेहराही पाहता आला नाही”; शरद पवारांसमोर संतोष जगदाळेंच्या पत्नीचा टाहो
-शरद पवारांनी ठाकरेंना लिहिलेले ‘ते’ पत्र आयोगासमोर यायला पाहिजे; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले