पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP)चे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची गुप्त भेट झाली. जुन्नरमध्ये झालेल्या या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी बीड पाणी प्रश्नांची चर्चा झाली असल्याचे सांगून भेटीवरमध्ये नेमकी या चर्चा झाली यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्नरमधील सत्र न्यायालयाच्या उद्घाटनानंतर अजित पवार जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले. यावेळी संदीप क्षीरसागर यांच्यासोबत त्यांची गुप्तभेट झाली. या गुप्त बैठकीवेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हते.
संदीप क्षीरसागर यांच्या भेटीनंतर पत्रकारांनी या भेटीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘बीड शहरात २० दिवस पाणी नाही, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि बीडचा पालकमंत्री असल्याने यातून काहीतरी मार्ग काढा हे सांगायला लोकप्रतिनिधी म्हणून संदीप क्षीरसागर आले आहेत. क्षीरसागर विरोधी पक्षाचे जरी आमदार असले तरी मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. म्हणून मला भेटायला येणारच. आम्ही पण विरोधी पक्षात असताना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायला जायचो. पत्रकार लगेच या गोष्टीची ब्रेकिंग न्यूज करतात. बीड शहरात २० दिवस पाणी नाही तातडीची गरज म्हणून ते मला भेटायला आले. मी ही अधिकाऱ्यांना फोन केला आहे. तातडीने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे म्हणत अजित पवार पत्रकारांवर चिडल्याचे पहायला मिळाले.
“अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. बीड नगरपालिकेचा पाणी प्रश्न गंभीर हे नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना तयार असुन वीजेचा प्रश्न असल्याने पाणी उपलब्ध असुन देखील देता येत नाही . या संदर्भात बैठक देखील घेतली होती मात्र, रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो होतो. माजी आमदार अतुल बेनके माझे मित्र आहेत. कृषी उत्पन्न कार्यालयात अजित पवार येणार असल्याने त्यांना भेटायला आलो आहे”, असे संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेच्या पराभवाची धूळ झटकणार, राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात
-‘आपल्याला पुणे जिंकायचंच’, बावनकुळेंचा नारा; पुण्यात भाजप ‘एकला चलो’?
-प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?
-रात्री-अपरात्री मांजराचे आवाज एक महिला अन् ३५० मांजरी; नेमका काय प्रकार?
-मॅट्रिमोनिअल साईटवरची ओळख पडली महागात, लग्न होण्याआधीच आयटीमधील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार