पुणे : गेल्या काही वर्षांपूर्वी झालेल्या दंगल प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी आज पुण्यात पार पडली. या चौकशी दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाच्या पत्राचा उल्लेख केला आहे. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठवले होते. आज पार पडलेल्या सुनावणीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“आजच्या सुनावणीसाठी आम्ही आयोगापुढे अर्ज दिला होता. त्यात मागणी केली होती की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र दिले होते, त्यात त्यांनी ‘भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता’, अशा स्वरूपाचे ते पत्र होते.
“या संदर्भात आता शरद पवार यांना आयोगाकडून पत्र देण्यात येईल. त्या पत्रामध्ये आयोग शरद पवार यांच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राबाबत विचारणा करेल. तसेच तारीख देऊन त्या तारखेपर्यंत ते पत्र सादर करण्यास सांगेल. हे पत्र आयोगासमोर आल्यानंतर आयोगाला आपला निकाल देण्यासाठी मदत होणार आहे” असे आंबेडकर म्हणाले आहेत.
“ते पत्र आयोगासमोर यायला हवं”
“शरद पवार यांचे पत्र हे आयोगासमोर यायला हवं आणि शरद पवार यांचं म्हणणं देखील आयोगाने ऐकून घ्यायला हवं, अशी आमची मागणी होती. त्यानुसार आयोगाने ही मागणी मान्य केली आहे. शरद पवार यांच्याकडे त्या संदर्भातील पत्र असेल तर भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर ती बाजू आली पाहिजे, अशी आमची मागणी होती, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुणे महापालिकेत सरकारी नोकरीची संधी; कशी आहे अर्ज प्रक्रिया
-काश्मीरमध्ये हल्ला: काश्मीरमधील पर्यटकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील जोडपे पुढे सरसावले
-फिरायला गेले ते परतलेच नाहीत! कश्मीर हल्ल्यात पुण्याच्या २ जिवलग मित्रांचा मृत्यू
-युपीएससी २०२४चा निकाल जाहीर! पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
-भाजप मंडल अध्यक्ष व्हायचं असले तर DNA…; ‘त्या’ बॅनरची राज्यभर चर्चा