पुणे : महाविकास आघाडीने पुण्यात मिळवलेल्या यशानंतर विधानसभेसाठी सर्व मित्र पक्षांना राज्यात जोमाने काम करण्यास सुरवात केली. पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी १२ मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची या १२ मतदारसंघामध्ये कोंडी होऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली पुणे जिल्ह्यातील २१ पैकी २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ३ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर २०१९मध्ये १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली त्यामध्ये १३ पैकी १० जागांवर विजय मिळाला. त्यानंतर आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्यातील २१ पैकी १२ जागांवर फिल्डींग लावल्याचे पहायला मिळत आहे.
२०१९ मध्ये झालेल्या १० आमदारांपैकी ९ आमदार हे अजित पवारांसोबत असून एकटे शिरुरचे आमदार अशोक बापू पवार हे शरद पवारांसोबत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवारांनी अजित पवारांसाठी धक्कातंत्राचा वापर सुरु केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवारांना धक्का देत अनेक नेते पदाधिकारी आपल्याकडे घेतले. त्यानंतर भाजपला धक्का देत माजी आमदार बापू पठारे यांची देखील घरवापसी करुन घेतली. आणि आता बारामती, इंदापूर, मावळ, भोसरी, वडगाव शेरी, पिंपरी, चिंचवड, हडपसर, शिरुर, जुन्नर, खेड-आळंदी, आंबेगाव, या १२ विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांनी चांगलीच फिल्डींग लावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दौरा मोदींचा, शक्तीप्रदर्शन इच्छुकांचं; शहरभर झळकले बॅनर्स
-वडगाव शेरीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा कायम; महाविकास आघाडीत रस्सीखेच
-वाहतूक कोंडीची हद्द झाली! प्रवाशी नाश्ता करुन आले तरी गाड्या जागच्या हलल्या सुद्धा नाहीत
-महात्मा फुलेंच्या विचारांचा मोदींकडून अपमान; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका