पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यासाठी मेट्रोच्या रुळावर उतरत आंदोलन केले. यावेळी हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकामधील मेट्रो ट्रॅकवर उतरून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे गेल्या एक तासापासून मेट्रो ही खोळंबली. पोलीस या आंदोलनकर्त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न करतायेत यासाठी आणखीन पोलीस बळ देखील बोलवण्यात आलं आहे. आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत.
मेट्रोमध्ये तरुणांना रोजगार मिळावा, या मागणीसाठी शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाकडून पुणे महानगरपालिकेच्या जवळील मेट्रो स्टेशन च्या ट्रॅकवर उभा राहून आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष नरेंद्र पावटेकरांसह काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अॅक्शन मोडवरती आले आहेत.
प्रशांत जगताप नेमकं काय म्हणाले?
‘पक्षाला विश्वासात न घेताच हे स्टंटबाजीचं आंदोलन परस्पर केलं होतं. आंदोलकांनी पोलिसांवरही हात उचलल्याचा आंदोलकांवर आरोप आहे. या घटनेनंतर आंदोलनात असणाऱ्या कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नरेंद्र पावटेकर असं या स्टंटबाज आंदोलकाचं नाव आहे’, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.
‘पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या, निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत. आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची आडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे’, असं प्रशांत जगताप यांनी जाहीर केले आहे.
या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासोबत चुकीच्या पद्धतीने वाद घातले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे, मी नरेंद्र पावटेकर या कार्यकर्त्याच्या हकालपट्टी करत आहे. ती करत असताना मी सांगू इच्छितो, पक्षाला सांगून किंवा पक्षाची परवानगी घेऊन कार्यकर्ता आंदोलन करेल तरच ते आंदोलन अधिकृत समजण्यात यावं, आजचा आंदोलन हे पक्षाचं आंदोलन नाही, या चुकीच्या कृतीची पक्षपाठ राखण करणार नाही, या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो यासंदर्भात नरेंद्र पावटेकर याची हकालपट्टी करतो, असेही प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उषा काकडेंचा आत्महत्येचा प्रयत्न की फूड पॅायझनिंग? रुग्नालयाने दिली महत्वाची माहिती
-Pune: गौरव आहुजाने माफी मागितलेले शिंदे साहेब नेमके कोण?
-संजय काकडेंच्या पत्नीला विषबाधा? रुग्णालयात केलं दाखल, नेमकं कारण काय?
-लेकाच्या संतापजनक कृत्यावर बापाची प्रतिक्रिया; ‘तो माझा मुलगा, त्याने सिग्नलवर नाही तर माझ्या…’