पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचा प्रदेश उपाध्यक्ष शंतनू कुकडेवर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप रंगताना पहायला मिळत आहे. कुकडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे नुकतेच शिंदेसेनेत प्रवेश केलेले रवींद्र धंगेकर यांनी कुकडे हा गोरगरीब हिंदूंचे धर्मांतरण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. दरम्यान आता कुकडेने डिसेंबर महिन्यातच पदाचा राजीनामा दिल्याचं पुढे आलं आहे.
बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत शंतनु कुकडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुकडेचा कॅम्प परिसरात आलीशान बंगला असून तो येथे गरजु विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करतो. काही महिन्यांपूर्वी दोन मुली बंगल्यात राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या मुलींकडून कुकडेने विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याने राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं. शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी कुकडेवर गंभीर आरोप करत धर्मांतरासाठी त्याला विदेशातून फंडिंग होत असून गरीब हिंदूंचे धर्मांतर करून घेत असल्याचा गंभीर आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असल्याने पक्षातून कोणी त्याला साथ देत आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान आता कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नसल्याचं पुढे आले आहे.
शंतनू कुकडे याने डिसेंबर 2024 रोजी पक्षाचा सदस्य आणि उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेशाध्यक्षांकडे हा राजीनामा सोपवण्यात आला होता. मानसिक स्थिती चांगली नसल्याचे कारण यावेळी देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘लाडका दोस्त देशाचा लाडका…’; मुरलीधर मोहोळांचं भाषण ऐकून मित्राने केला कौतुकाचा वर्षाव
-शिंदेसेनेत जाताच धंगेकरांचे हिंदुत्व जागे, अजितदादांना म्हणाले “त्या पदाधिकाऱ्याला हाकला..”
-पुणे महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचे प्रशिक्षण
-पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; मानकरांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट, केली ‘ही’ मागणी