पुणे : पुणे महानगरपालिका भवन मेट्रो स्थानक परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलन करणाऱ्या ९ जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी २ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. या प्रकरणातील उर्वरित ८ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मेट्रो मार्गावर आंदोलन प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
मेट्रो स्थानक परिसरात रविवारी आक्रमक आंदोलन करणाऱ्या नरेंद्र पावटेकरसह काही साथीदारांवर पक्षाकडून निलंबित करण्यात आले आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कोणतीही कल्पना न देता परस्पर आंदोलन केले. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी नरेंद्र पावटेकर (वय २५), त्याचे वडील ज्ञानेश्वर (वय ६२, दोघे रा. गणेश पेठ) यांच्यासह ९ जणांना न्यायालयाने सोमवारी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी पावटेकरने आंदोलन करण्यापूर्वी कोणाशी संपर्क साधला, तसेच संदेश पाठविला, यादृष्टीने तपास करायचा आहे. मेट्रो स्थानक संवेदनशील ठिकाण आहे. आरोपींनी मेट्रो मार्गिका (रुळ), तसेच, इलेक्ट्रिक वायरचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्याशी झटापट केली. आरोपींनी पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतले. झटापटीत पोलीस निरीक्षक सावंत यांच्यासह पाच महिला पोलीस कर्मचारी जखम झाल्या. आंदोलनामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या दृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडीत देण्याची विनंती सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी युक्तिवादात केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात होणार दोन मेट्रो मार्गिकेचा विस्तार; राज्याने पाठवला तब्बल एवढ्या कोटींच्या निधीचा प्रस्ताव
-लाडक्या बहिणींसाठी आणखी ३६ हजार कोटींची तरतूद पण तरीही २१०० रुपये नाहीच
-आधी म्हणायचे मी काँग्रेसचा हिरो, आता धरली शिंदे सेनेची वाट; रवींद्र धंगेकर चौथ्यांदा पक्ष बदलणार
-शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांच्या अंगावर ओतलं पेट्रोल अन्…
-पुण्यात शरद पवार गट आक्रमक; शहराध्यक्षांकडून आंदोलक कार्यकर्त्यांचं निलंबन, नेमका काय प्रकार?