पुणे : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सीबीएसई पॅटर्नबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
“केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढा आहे.म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ सुरू करण्यात येणार आहे. तर, शैक्षणिक वर्ष शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अन्य इयत्तांचा ‘सीबीएसई’नुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल. दरम्यान, या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल”, असे वक्तव्य दादा भुसे यांनी केलं आहे.
“राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा”, अशीही माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट; बड्या नेत्यांची होणार घरवापसी
-किरीट सोमय्यांचा मोठा दावा; ‘…तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळेंसोबत होता’
-पुण्यात कंटेनरचा थरार; भरधाव वेगाने पोलिसांच्या गाडीसकट २०-२५ गाड्या उडवल्या
-कृषी मंत्र्यांकडून पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख; अजित पवार म्हणाले, ‘अरे तो पहाटेचा…’