पुणे : पुणे शहराला विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वासरा लाभलेलं शहर म्हटलं जातं. याच पुण्यात आता विद्येच्या मंदिरात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेतील एका शिपायाने शाळेच्या चेंजिंग रुममध्ये कपडे बदलण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींचे व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत. या प्रकरणी आता शाळेच्या शिपायावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (६ जानेवारी) पाषाण भागातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थीनी खेळाचा तास संपल्यावर शाळेतच असणाऱ्या चेंजिंग रुममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या होत्या. तिथेच शाळेचा शिपाई तुषार सरोदे उपस्थित होता. या नराधमाला संबंधित विद्यार्थीनींनी तिथून जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्या मोबाईलचा कॅमेरा सुरु ठेऊन रुममध्ये एका स्विचबोर्डवर ठेवला. त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचा ड्रेस चेंज करतानाचा व्हिडीओ शूट झाला.
संबंधित मुलींच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तो व्हिडीओ मोबाईलमधून डिलीट केला. घडलेला प्रकार विद्यार्थीनींनी पालकांना सांगितला. पालकांनी शाळेच्या मुख्यधापिकांची भेट घेतली. त्यावेळी शिपाई सरोदेला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला. मात्र, हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला समजला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा आरोपी सरोदेकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंग चालू करुन ठेवला असल्याची कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्याव्यस्थापानाने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपी शिपायावर तात्काळ गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला मुख्यबाजार पेठेत उभारू लागल्या, तक्रार करण्यासाठी आमदार थेट पोलिसांत
-महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक; पोलीस आयुक्तांची घेतली भेट
-…म्हणून आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदाचा खून; तपासात धक्कादायक कारण आलं समोर
-मसाज पार्लरच्या नावाखाली सुरुय भलताच कारभार; पोलिसांनी मारला छापा अन्…
-फेसबूक, इन्स्टाग्राममध्ये होणार मोठा बदल; मेटा कंपनीचा निर्णय, काय बदल होणार?