पुणे : लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्या. महाविकास आघाडीला लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विधानसभेत मात्र अनपेक्षित पराभव पत्कारावा लागला आहे. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. त्यानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याच्य़ा चर्चेबाबत राऊतांनी रोखठोक भाष्य केले आहे.
‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकारचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका लवकरच होतील, अशी शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून पक्ष आणि संघटन बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी आज दिवसभर बैठका घेणार आहे’, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
मुंबई महापालिका निवडणुका हा कळीचा मुद्दा आहे. विधानसभा निवडणुकीतही मुंबईमधून आम्ही १० जागा जिंकल्या तसेच ४ जागा कमी मतांनी आम्हाला गमावाव्या लागल्या. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई महापालिका निवडणूक काहीही करून आम्हाला जिंकावीच लागेल. नाहीतर मुंबई वेगळी केली जाईल. मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा रेट आहे आणि आमची त्या ठिकाणी निर्विवाद ताकद देखील आहे. त्यामुळे मुंबई जर आपण स्वतंत्रपणे लढलो तर चांगला रिझल्ट देऊ शकतो, अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढवायची आणि पुणे, नाशिक, इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवल्या जाण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! सिग्नल मोडणं पडतंय महागात; ११ महिन्यात ४२ हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
-क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत पुण्यानं पटकावलं पाचवा क्रमांक; कशात केली सर्वाधिक गुंतवणूक?
-पुण्यात थंडी घटली पण थंडगार वाऱ्यामुळं पसरली धुक्याची चादर
-रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ विकणं पडलं महागात; नळ स्टॉपवरील ‘त्या’ स्टॉल धारकांवर गुन्हे दाखल
-आता आरटीओला न जाताही मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स; कसं? वाचा सविस्तर…