पुणे : मराठी सिनेमा ‘नवरा माझा नवसाचा २’च्या प्रमोशनसाठी मराठी अभिनेता सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
‘आज मला इथं येण्याचं भाग्य मिळालं. काहीतरी अद्वितीय आणि अद्भुत बघितल्याचं मला समाधान मिळालं, याचं आंतरिक समाधान वाटतंय. गणपतीची मूर्ती बघून हृदयात हललं. इतकं या गणपतीच्या मूर्तीत तेज आहे. यामागे भाऊसाहेब रंगारी यांची तपश्चर्या होती. त्यांच्याबद्दल यात जे लिहलेय ते वाचायला मला खूप आवडणार आहे. या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. हे वाचायला मी खूप उत्सुक आहे. मला खूप वाईटही वाटतेय की मला याबद्दल अगोदर माहिती नव्हती’, असे सचिन पिळगावकर म्हणाले आहेत.
आता मात्र एकही मनुष्य असला नाही पाहिजे आपल्या हिंदुस्तानात ज्याला हा बाप्पा माहीत नसेल. हा पहिला सार्वजनिक गणपती आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी तो लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. अगदी भक्तिभावाने मी गणपती बाप्पाला वंदन करतो आणि भाऊसाहेब रंगारी यांना मानवंदना देतो. मला आनंद आहे की लोकांपर्यंत हे पुनीत बालन पोहोचवत आहेत. त्यांना धन्यवाद देतो, असेही सचिन पिळगावकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीला घराबाहेर पडताना आधी हे वाचाच, शहरातील वाहतुकीत मोठा बदल
-हडपसर विधानसभेतून चेतन तुपेंचा पत्ता कट? नाना भानगिरेंना संधी मिळण्याची शक्यता
-पॅरॉलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांचे बक्षिस
-गणेश विसर्जनादिवशी शहरातील ‘हे’ १७ मुख्य रस्ते असणार बंद; कोणत्या रस्त्यावर पार्किंग मनाई?