पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे गाडीने दोन तरुणांना चिरडलं आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत धडक दिल्यामुळे दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.यामध्ये एका मुलाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या तरुणाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जणांचा जीव घेतला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकिब रमजान मुल्ला याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. कारचालक असलेल्या १७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. ब्रह्मा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीचे मालक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने अत्यंत बेदरकारपणे त्याची आलिशान गाडी चालवीत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली.
वेदांत अगरवाल (रा.ब्रम्हा सनसिटी) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात अनिस अवलिया आणि अश्विनी कोस्ता यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दोघेही परराज्यामधील होते. याप्रकरणी अनिस आणि अश्विनी यांचा मित्र अकीब रमजान मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे. अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकल वरून कल्यानीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते. त्यावेळी वेदांत त्याच्या पोर्शे कारमधून भरधाव निघाला होता. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati | अजितदादांचं बॅक टू वर्क सुरु; सकाळी केली विकास कामांची पाहणी
-Pune News : धक्कादायक! पुण्यात गॅस चोरी करताना झाला मोठा स्फोट अन्…
-‘शाहरुख अन् करणचे ‘तसले‘ संबंध’; दाक्षिणात्य गायिकेचा मोठा गौप्यस्फोट
-मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी