पुणे : एकीकडे राज्यात महिला सुरक्षा, महिला अत्याचार, नागरिकांचे सामान्य प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरुन, वाघ्या कुत्र्याची समाधी, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे अशा अनेक प्रश्नांवरुन राज्याच्या राजकारणात मोठे वाद सुरु आहेत. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमावरुन महायुतीमध्ये सुरु असलेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतनिमित्त पुण्यात होणाऱ्या धनगरी नाद कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आलं आहे मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कार्यक्रमास बोलवणार नसल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून पडळकरांवर टीका करताना दिसत आहेत. काल पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. तर आज पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पडळकरांवर टीका केली आहे.
मी काय म्हणते गोप्या भाऊ, सूर्यावर थूकुन तुझ्यावरच थुंकी पडते ना रे. राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचाराचा, कर्तृत्वाचा पाईक बनायचे, वागायचे सोडून वाचाळ बडबडतोस की तू… अजून किती बेइज्जत होऊन लायकी घालवून घेणार आहेस, अशा शब्दात रुपाली ठोंबरे पाटलांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आगपाखड केली आहे.
मी काय म्हणते गोप्या भाऊ ,
सूर्यावर थूकुन तुझ्यावरच थुंकी पडते ना रे.राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचाराचा , कर्तृत्वाचा पाईक बनायचे,वागायचे सोडून वाचाळ बडबडतोस की तू
अजून किती बेइज्जत होऊन लायकी घालवून घेणार आहेस. pic.twitter.com/eIShNwSZYY— Rupali patil thombare (@Rupalispeak) April 18, 2025
गोप्यासारखी बिरोबाची खोटी शपथ न घेता बिरोबाची शपछ घेऊन सांगतो की, डिपॉझिट जप्त विक्रमवीर मंगळसूत्रचोर माननीय गोप्याने आमच्या धनगर समाजाचा एकट्याने काही मक्ता घेतला नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला अजितदादांसह सर्वांचेच स्वागत आहे, असे रुपाली पाटलांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये शेअर केलेल्या पत्रामध्ये ‘खोट्या शपथा घेणाऱ्या गोप्याला कुणीही फारसे महत्व देऊ नये’, अशी टीपही टाकण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, महाराष्ट्रात रहायचं असेल तर…’; अजित पवारांचं वक्तव्य
-स्वारगेट प्रकरण: न्यायालयात भक्कम पुराव्यासह ८९३ पानांचं आरोपपत्र दाखल; दत्ता गाडेचा ‘तो’ दावा फोल
-‘मी २२ व्या वर्षीपासून सफारी गाडीतून फिरतो, तेव्हा तुम्हाला चड्डी पण…’; पडळकर नेमकं कोणाला म्हणाले?
-पुण्यात दर्गात घुसून राडा; खासदार कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी